Published On : Fri, Nov 12th, 2021

रेड्डी यांची महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट व पाठिंबा

– एस टी कर्मचारी संपाचा पेच कायम,तहसीलदार रामटेक यांच्या मार्फत शासनाला निवेदन

रामटेक -लाल परी म्हणून ओळख असलेली ST बस चे कर्मचारी संपूर्ण राज्यात स्वतःच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत, त्यांच्या मागण्या ग्राह्य असून राज्य सरकारने लवकरात लवकर त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या, शिवाय त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाही करू नये तसेच लवकर लवकर राज्य शासनाने या बद्दल तोडगा काढला पाहिजे,

या बाबत रामटेक बस डेपो येथे सर्व आंदोलनकर्ते याची भेट घेऊन भाजप च्या वतीने पाठिंबा जाहीर केला, त्यावेळी सर्व कर्मचारी यांनी आपली मागण्या सांगितल्या, लवकरात लवकर यावर तोडगा काढावा व सर्व कर्मचारी यांना न्याय देण्यात यावा .याबाबत चे निवेदन, तहसीलदार रामटेक यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले.


यावेळी रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी , नगराध्यक्ष दिलीप देशमुख , भाजप तालुका अध्यक्ष नरेंद्र बंधाटे, नगर परिषद उपाध्यक्ष आलोक मानकर,करीम मालाधारी,रजत गजभिये, अतुल पोटभरे, विकास धुराई, चंद्रामनी धमगाये,राजेश जयस्वाल, विशाल कामदार, इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.