Published On : Mon, Apr 3rd, 2017

मालमत्ता कर अभय योजनेअंतर्गत २३ कोटी ६२ लाखांची वसुली

नागपूर: महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या ‘मालमत्ता कर अभय योजना-२०१७‘ अंतर्गत १६ ते ३१ एप्रिलदरम्यान २३ कोटी ६२ लाख ७२ हजार ३०५ रुपयांची वसुली झाली आहे.

योजनेच्या अखेरच्या दिवशी पाच कोटी २३ लाख आठ हजार ७५९ रुपयांची वसुली झाली. ३१ मार्च रोजी झोननिहाय वसूल झालेली मालमत्ता कराची रक्कम पुढीलप्रमाणे आहे. कंसात योजनेदरम्यान जमा झालेली रक्कम आहे. लक्ष्मीनगर झोन ८७ लाख ७८ हजार रुपये (चार कोटी ६३ लाख ३८ हजार रुपये), धरमपेठ झोन ७० लाख २१ हजार ७९५ रुपये (दोन कोटी ४२ लाख २३ हजार ४१३ रुपये), हनुमाननगर झोन २६ लाख ३५ हजार १८९ रुपये (एक कोटी ११ लाख ८१ हजार ६०४ रुपये), धंतोली झोन- ६१ लाख ७० हजार ८९ रुपये (८७ लाख ८७ हजार ६७९), नेहरूनगर झोन-१८ लाख ११ हजार २६७ रुपये (७० लाख ७७ हजार ९९० रुपये), गांधीबाग झोन – ३८ लाख ६७ हजार ४०३ रुपये (एक कोटी २७ लाख ४७ हजार ४७७ रुपये), सतरंजीपुरा झोन-२४ लाख ८० हजार ७११ रुपये (६९ लाख ५३ हजार १८ रुपये), लकडगंज झोन-३६ लाख ९० हजार २३५ रुपये (एक कोटी ६७ लाख ५२ हजार ३४४ रुपये), आसीनगर झोन-६६ लाख २० हजार रुपये (दोन कोटी २३ लाख १२ हजार ३२ रुपये), मंगळवारी झोन – ९२ लाख ३४ हजार ७० रुपये (दोन कोटी ७५ लाख ८९ हजार ९८९ रुपये).