Published On : Tue, Dec 24th, 2019

रसीखेच राज्य विजेता संघाचे कन्हान शहर विकास मंच व्दारे जंगी स्वागत

कन्हान : – औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य स्तरीय साखळी रेसीखेच स्पर्धेत नागपुर जिहयाचे प्रतिनिधीत्व करित सुवर्ण पदक जिंकुन बीकेसीपी शाळा कन्हानचा संघ कन्हान नगरीत आगमण होताच शहर विकास मंच व्दारे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य स्तरीय मैदानी साखळी रसीखेच स्पर्धा टग ऑफ वार स्टेट असोशियन व्दारे औरंगाबाद येते दि.२१ व २२ डिसेंबर ला घेण्यात आल्या. यात महाराष्ट्रातील १८ संघ सहभागी झाले असुन नागपुर जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करित बीकेसीपी शाळा कन्हान च्या १३ वर्षातील वयोगटातील ३८० किलो वजन गटात संघाने कोल्हापुर, नाशिक, बुलढा णा, मुबई, सोलापुर च्या संघाना ० – २ च्या फरकाने विजय मिळवुन अंतिम सामन्यात नाशिक संघाला ० – २ ने पराजित करून सुवर्ण पदक प्राप्त केले.

राज्य स्तरीय रसीखेच स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकुन नागपुर जिल्हाचे व शहरा चे नावलौकिक करून शहरात सायंका ळी ७ वाजता आगमण होताच कन्हान शहर विकास मंच व ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे शाळेच्या पटागंणात क्रिडा शिक्षक अमित ठाकुर, खेडाळु आंनद दिप सिंग सिधु, तनिष्क गणेश मानकर, निकुंज विजय राठी, आयुष श्रीकृष्णा दहीफळकर, उत्कर्ष मोतीराम रहाटे, अंनत अजय सिंग, पार्थ प्रमोद माहोरे, शिवांश दिनेश सिंग यांचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला.

आणि पुढील वाटचालीस शहरवासीया तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे, उपाध्य क्ष ऋृषभ बावनकर, सचिव अभिजीत चांदुरकर, सोनु मसराम, रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम, हरीओम प्रकाश नारायण, सचिन यादव, चंदन मेश्राम, महेश शेंडे, सोनु खोब्रागड़े, दिनेश भालेकर, प्रशांत मसार, मुकेश गंगराज, प्रकाश कुर्वे, शाहरुख खान, अमित भारव्दाज, अक्षय फुले, शुभम मंदुरकर व ग्रामिण पत्रकार कन्हान अध्यक्ष मोतीराम रहाटे, कमल सिंह यादव, रविंद्र दुपारे, श्रीकृष्णा दहीफळकर,शांताराम जळते, प्रेमचंद राठोड, गणेश खोब्रागडे, विजय राठी, गणेश मानकर सह मान्यवर शहरवासी प्रामुख्याने उपस्थित होते.