Published On : Wed, Oct 31st, 2018

सार्वजनिक वाचनालयात वाचक मेळावा व सत्कार सोहळा संपन्न

कन्हान : – राजीव गांधी बालोद्यान हनुमान नगर कन्हान येथील सार्वजनिक वाचनालयात वाचक मेळाव्याचे आयोजन करून गुणवंत विद्यार्थी व निबंध स्पर्धाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात साजरा करण्यात आला.नुकताच सार्वजनिक वाचनालय कन्हान येथे दरवर्षी प्रमाणे नगर सुधार समिती अध्यक्ष सौ छायाताई प्रकाश नाईक यांच्या अध्यक्षेत व डॉ मनोहर पाठक उपाध्यक्ष न प कन्हान-पिपरी , सौ लक्ष्मीबाई लाडेकर नगरसेविका , सौ मायाताई इंगोले , सौ वैशाली डोणेकर, सौ विशाखा ठमके , एन एस मालविये, दिवाळुजी देशमुख, चंद्रकुमार चौकसे , मा बी जी बोरकर, सुनिल लाडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते सस्वसती व संस्थापक अध्यक्ष स्व. विठ्ठलराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दिप प्रज्वलन करून वाचक मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले . उपस्थितीत मान्यवरांना ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले .

१० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची ३७ वर्षाची परंपरा कायम ठेवत सुबोध मेश्राम, कु श्रृती बारई बी के सी पी स्कूल कन्हान, कु तुप्ती इखार धर्मराज वि कांद्री कन्हान व १२ वी च्या श्रृती रेखाते , अमित भारती, कु निशा पाली यांचा संस्थापक अध्यक्ष स्व. विठ्ठलराव नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मृतीचिन्ह, ग्रंथभेट व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . तसेच ” स्वच्छ कन्हान , सुंदर कन्हान ” या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत १९४ स्पर्धकांनी भाग घेतला . शंकर ञानेश्वर धावडे यांनी प्रथम क्रमांक तर व्दितीय क्रमांक कु निशा अशोक राठोड व कु कोमल सुरेश गोविंदवार यांना मिळाल्याने त्याना स्व. भास्करराव फरसोले स्मृती प्रित्यर्थ स्मृती चिन्ह, ग्रंथ भेट व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशिष सहारे यांनी तर आभार प्रदर्शन म केिले .

सार्वजनिक वाचनालय कन्हानचे सचिव श्री मनोहरराव कोल्हे यांनी प्रास्ताविकातुन वाचनालयाचा ४४ वर्षाचा प्रगतीचा प्रवासाची विस्तृत माहीत देऊन जेष्ठ नागरिकांना निशुल्क प्रवेश देण्यात येणार असल्याने जेष्ठ नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले. सर्व उपस्थितीतांना अल्पोहार व कोजागिरीचे दुध वितरण करून वाचक मेळाव्याची सांगता करण्यात आली .


कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सार्वजनिक वाचनालय कन्हानचे अध्यक्ष वासुदेवराव चिकटे ,उपाध्यक्ष मानिकराव वाघधरे,उमाकांत गायधने,निशा फरसोले , दिनकरराव मस्के , पुंडलिकराव कौंडलकर, प्रकाश व्ही नाईक, मोतीराम रहाटे , कमलसिंग यादव, अशोाक खंडाईत, एन के खानजोडे, रामराव धावडे , सौ वेणु चिकटे , वर्षां शिंगाडे , सारिका धावडे , माहुरकर मँडम, गजबे मँडम, अल्का कोल्हे , मायाताई भोयर, एम पी आस्टकर, एस आर बनकर, अरविंद सिंग, गजेंद्र बारई, योगेश बर्वे , प्रदीप भोंडे , गजेंद्र गिरडकर, श्याम बारई, कृणाल कोल्हे , रोशन तांडेकर, मनोज चिकटे , अतुल खोब्रागडे आदीने सहकार्य केले .