Advertisement
नागपूर: विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक, दै. तरुण भारतचे माजी मुख्य संपादक वामनराव तेलंग यांच्या निधनाने विदर्भातील प्रगल्भ साहित्यिक हरपला. विदर्भातील साहित्य विश्वाचे न भरून निघणारे नुकसान झाले असल्याची भावनिक प्रतिक्रिया केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले- वामनरावांनी पत्रकारितेसोबतच विदर्भ साहित्य संघाचे विविध पदे भूषविली. नवीन लेखकांना त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले. अनेक लेखक त्यांनी मेहनतीने उभे केले होते.
प्रभाकर सिरास आणि वामनराव यांची ‘वामनप्रभू’ ही लेखमालिका अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. एवढी ती लेखमालिका लोकप्रिय झाली होती. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ साहित्यिकाला आपण मुकलो अशी भावनाही गडकरी यांनी व्यक्त केली.
Advertisement