Published On : Fri, Jul 26th, 2019

अल्पसंख्याक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहचवा – प्रधान सचिव श्याम तागडे

अल्पसंख्याकांच्या विविध योजनांचा आढावा

नागपूर: केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्याकासाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अल्पसंख्याक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवावा, असे आवाहन अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी केले.

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विभागीय आयुक्त कार्यालयात अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांच्या प्रगतीची नागपूर विभागातील जिल्ह्यांची विभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीत उपायुक्त सुधाकर तेलंग, उपायुक्त संजय धिवरे, भंडारा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी आदी उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे धार्मिक अल्पसंख्यांकांमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, जैन, पारशी व ज्यू धर्मांचा समावेश होत असल्याचे सांगून श्याम तागडे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्याकांसाठी विविध योजना आहेत. या योजना महत्वाच्या असून त्यांच्या अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्याला अल्पसंख्यांक विकास योजनांचा निधी देण्यात आलेला आहे. मंत्रालय स्तरावर नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमधून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यांचा निधी लवकरच जिल्ह्यांना प्राप्त होईल. जे प्रस्ताव अद्यापपर्यंत मंत्रालयात पाठविण्यात आलेले नाहीत, त्यांना तात्काळ प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मंत्रालयात पाठविण्यात यावे, असे आवाहन तागडे यांनी यावेळी केले.

अल्पसंख्यांक विभागाच्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या करण्यासाठी, तसेच योजनांचा निधी खर्च करण्याच्या सूचना संबंधीत जिल्हाधिका-यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिका-यांनी त्यांच्यास्तरावर योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे, लवकरच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी चमूकडून पूर्ण झालेल्या योजनांची पाहणी करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.

यावेळी बैठकीत जिल्ह्यातील धर्मनिहाय, अल्पसंख्यांकनिहाय लोकसंख्या, शिष्यवृत्ती योजना (केंद्रीय व राज्यस्तरीय), डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची 70 टक्के संख्या असलेल्या शाळांना पायाभूत सुविधा पुरविणे, वसतिगृह योजना, मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग योजना, ग्रामीण क्षेत्र विकास योजना, शहरी क्षेत्र विकास योजना, मौलाना आझाद शिकवणी व संबंध योजना, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना यासह विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला नागपूर विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement