Published On : Fri, Mar 13th, 2020

अस्वच्छतेसाठी रविभवनात मनपाची कार्यवाही

Advertisement

आयुक्तांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने ठोठावला पाच हजारांचा दंड

नागपूर : स्वच्छता आणि अतिक्रमणासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशासनुसार धडक कारवाई सुरू आहे. याच अंतर्गत शुक्रवारी चक्क रविभवनात उपद्रव शोध पथकाने धडक दिली. रविभवन परिसरात आढळलेली अस्वच्छता आणि दुर्गंधीसाठी व्यवस्थापकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांची टीम नी ही कारवाई केली. रविभवन परिसरात मनपाचे उपद्रव शोध पथक पोहचले असता त्यांना ठिकठिकाणी अस्वच्छता आढळून आली. कचरापेटी असतानाही त्याच्याबाहेर कचरा पडलेला होता. प्लास्टिकच्या बॉटल्स, झाडांचा कचरा ठिकठिकाणी पडलेला होता.

पाण्याच्या फ्रीजजवळही अस्वच्छता आढळली. शासकीय इमारतींच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आवाहन वेळोवेळी केले असतानाही रविभवन परिसरात आढळलेली अस्वच्छता पाहून उपद्रव शोध पथकाने मनपाच्या धोरणानुसार रविभवन व्यवस्थापकांवर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.