
नागपूर : युवकांबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नागपुरात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. वैशाली नगर परिसरात युवा सेना शहराध्यक्ष शरद सरोदे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन करत राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
“युवकांना बिनडोक” असे संबोधल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या वक्तव्यामुळे युवकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी राऊत यांनी युवकांची माफी मागावी, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, भविष्यातही युवकांविरोधात अशा प्रकारची वक्तव्ये करण्यात आल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. या आंदोलनामुळे काही काळ वैशाली नगर परिसरात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




