Published On : Sat, Sep 2nd, 2017

गोवा-बोरिवली बसचा अपघात, दोघांचा मृत्यू, 35 जण जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी राजापूर वाटूळजवळ गोवा-मुंबई महामार्गावर खासगी बसला रात्री अपघात झाला आहे. गोव्याहून मुंबईला परतणाऱ्या बसच्या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 32 जण जखमी झाले आहेत.

गोव्यावरुन शुक्रवारी संध्याकाळी मुंबईच्या दिशेनं निघालेल्या खासगी बसला रत्नागिरीमध्ये अपघात झाला. राजापूरच्या वाटूळजवळ चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाली. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एका प्रवाशावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

कोकणात गणेशोत्सवानिमित्त गेलेल्या चाकरमान्यांना घेऊन ही बस मुंबईतील बोरीवलीला परतत होती. या अपघातात 32 जखमी झाले असून त्यांच्यावर लांज्याच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.