Published On : Fri, Nov 6th, 2020

आरोग्यक्षेत्रामधील पायाभूत सुविधांचा छोट्या मोठ्या शहरांमध्ये आता झपाट्याने विकास

आरोग्यक्षेत्रामधील पायाभूत सुविधांचा छोट्या मोठ्या शहरांमध्ये आता झपाट्याने विकास होत आहे. विशेषज्ञ वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या, इस्पितळे, आणि रुग्ण सेवा करणाऱ्या सुविधांमध्ये मोट्या प्रमाणात वाढ होतांना दिसून येते.

आजची जीवनशैली बघता आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यासाठी प्रत्येकाला आज सर्व-सोयी युक्त उपलब्ध दवाखाना पाहिजे असतो. वैद्यकीय सेवा व रुग्णांचा उपचार यामध्ये प्रशिक्षित सहयोग्यांची भूमिका महत्वाची असते. रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर, शारिरीक, मानसिक, व वैद्यकीय आधाराची पुढील काही दिवस गरज असते. व हा काळ त्या रुग्णाला संपूर्ण बरे होण्याकरिता अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळे अशा वेळी प्रशिक्षित सहायक, ज्यांना प्राथमिक आरोग्य सेवेची माहिती, औषोधोपचार व रुग्णांना वैद्यकीय आधार देण्याचे प्रशिक्षण प्राप्त आहे.

अशा व्यक्तींची नेहमीच गरज असते. आजारांमध्ये पॅरालिसिस, ब्रेन स्ट्रोक,ऑपेरेशन झालेले रुग्ण , जे बेड रिडेन रुग्ण आहेत त्यांना जागेवरच सुश्रुषेतेची गरज असते. परंतु दवाखान्यात येणारा खर्च अमाप असतो. तो प्रत्येकाला झेपेल असे नाही. या सर्वांचा विचार करूनच सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी काही तरी असे करावे कि रुग्णांची गरज पूर्ण होईल आणि येणारा दवाखान्यातला खर्च पण कमी होईल. यासाठी पुढाकार घेतला तो म्हणजे डॉ. रवि अशोक वानखेडे यांनी.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व वयोधा वेलनेस ने राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सोबत लर्निंग एंड एक्सटेंशन विभाग, यांनी मिळून रिहेबिलिटेशन टेक्नीशियन चा मान्यता प्राप्त लघु पाठ्यक्रम , संपूर्ण पँरामेडिकल व सहायक कौशल्य चा प्रत्यक्ष अनुभव हा कोर्स सुरु केला आहे.
ह्या पाठ्यक्रम चे संयोजक डॉ. रवि अशोक वानखेडे(MS,MS,PHD,BCPS) संचालक- वयोधा, श्री जयंत पाठक-(अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था – क्षेत्रिय केन्द्र नागपूर), डॉ धनंजय ऊकाळकर,(एमबीबीएस, एमडी, डीएनबी नेफ्रोलॉजी), डॉ पुष्पहास बल्लाळ (एफडीए, सहायक कमीशनर,ड्रग्स) यांनी विद्यार्थ्यांना आव्हान केले आहे कि जास्तीत जास्तविद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा. त्याच प्रकारे आम जनतेला सुद्धा आव्हान केले आहे कि त्यांनी गरजू विद्यार्थाना हा कोर्स करण्यासाठी आर्थिक मदत करावी.

रिहॅबिलिटेशन टेक्निशियन पॅरामेडिकल अभ्यासक्रम ह्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी खूप आहे