Published On : Sat, Mar 20th, 2021

राज्य सरकारचे मंत्री खंडणीखोर-बलात्कारी-व्यभिचारी, मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण सुटले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजीनामा दयावा : आ.कृष्णा खोपडे

नागपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख खंडणीखोर असल्याचा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी आयुक्त परमवीर सिंह यादव यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या या पत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सहित अनेक बड्या पोलीस अधिका-यांची नावे आहेत. तसेच सचिन वाझे हे सरकारसाठी खंडणी वसुलीचे काम करायचे. हे देखील पत्रात नमूद आहे. नुसते गृहमंत्रीच नव्हे तर यापूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यभिचार करीत दुसरी पत्नी असल्याचे कबूल केले. हे प्रकरण शांत होत नाही तोच वनमंत्री संजय राठोड यांच्यावर महिलेशी संबंध असल्याचे आरोप झाले. त्यांना चक्क राजीनामा दयावा लागला. साधूसंतांची हत्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची पायमल्ली, पत्रकारांना तुरुंगात डांबणे, अशा अनेक अनैतिक घटना या सरकारच्या कालकीर्दीत झाल्या. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील थोडीशी लाज-लज्जा असेल तर तात्काळ राजीनामा देऊन नैतिकता दाखवावी, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.

पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते भाकीत
राज्याचे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर वारंवार सचिन वाझे हा फक्त मोहरा असून या मागे अनेक बडे नेते असल्याचे भाकीत केले होते. परंतु निर्लज्ज सरकारने त्यांच्या वक्तव्यावर कानाडोळा केला. यापूर्वी 5 वर्ष ते स्वत: मुख्यमंत्री राहीले, गृहमंत्री राहिले. मात्र त्यांचे नेतृत्वात प्रगतीपथावर जात असलेल्या महाराष्ट्र राज्याला या तिघाडी सरकारने नुसते बदनाम करण्याचे काम केले. कोरोनाचा बहाणा सांगून सर्व विकासकामे रोखल्या गेली. जनतेला चव्हाट्यावर ठेवून आपले बंगले मंत्र्यांनी चमकविण्याचे काम केले. महिला अत्याचार वाढले, खंडणी वसुलीट वाढ झाली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या महाराष्ट्राला काळिमा फासण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वात या तिघाडी सरकारने केले.

ही बाब अत्यंत निंदनीय आहे व निदान संताची भूमि असलेल्या या राज्याची गरिमा राखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजीनामा दयावा. अन्यथा भा.ज.प.च नव्हे तर जनता देखील रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.