Published On : Fri, Mar 20th, 2020

कन्हान नगर परिषद मुख्याधिकारी ला 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

-कन्हान नगर परिषद मुख्याधिकारी सतीश गावंडे वर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धाड

कामठी:-कन्हान नगर परिषद हद्दीत येणाऱ्या सिहोरा गावातील मातीचे उत्खनन करण्याची परवानगी मिळण्यासाठी कन्हान नगर परिषद कडून शक्य असलेल्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करणाऱ्या ठेकेदाराला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 1 लक्ष रुपयांची मागणी केली मात्र ही रक्कम देण्यास ठेकेदार इच्छुक नसल्याने झालेल्या तडजोडीतुन 50 हजार रुपये देण्याच्या ठरल्यावरून यासंदर्भात ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून रचलेल्या सापळ्यानुसार गरुड चौक कामठी येथे ठेकेदाराकडून 50 हजार रूपयाची लाच कार मध्ये स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्वरित धाड घालून रंगेहाथ अटक करीत जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून अटक मुख्याधिकारी चे नाव सतीश गावंडे वय 45 वर्षे रा रमनामारोती नागपूर असे आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर तक्रारदार हे गुरफडे ले आउट कन्हान येथील रहिवासी असून ठेकेदारीचा व्यवसाय करतो यानुसार कन्हान नगर परोषद हद्दीत येणाऱ्या सिहोरा गावातील माती उखन्नाचे काम करायचे होते त्यासाठी पारशिवणी तहसिल कार्यालय येथे रीतसर अर्ज सादर केला होता सदर अर्जाबाबत ना हरकत प्रमाणपत्र हे संबंधीताने कन्हान नगर परिषद ला केलेल्या अर्जानुसार पारशिवणी तहसिल कार्यालयाला ना हरकत प्रमाणपत्र पाठवायचे होते मात्र कन्हान नगर परिषद कडून हे ना हरकत प्रमाणपत्र पारशिवणी तहसिल कार्यालय ला न पाठविल्याने यासंदर्भात ठेकेदाराने कन्हान नगर परिषद चे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांना विचारणा केली असता यांनी हे एन ओ सी पाठवण्याकरिता ठेकेदार कडे 1 लाख रुपयांची मागणी केली मात्र झालेल्या तडजोडीत 50 हजार रुपये देण्याचे ठरले यावरून या ठेकेदाराने या प्रकरणाची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केले यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला व लाचेची रक्कम गरुड चौक कामठी येथे कार मध्ये मुख्याधिकारी ने स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्वरित धाड घालून अटक करण्यात आले.


ही यशस्वी कारवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर चे पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर व अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, शालिनी जांभुळकर, निशा उमरेडकर, राहुल बारई , राजेश बन्सोड यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे कामठी