Published On : Fri, Mar 20th, 2020

पडसाड येथे 10 एकरातील चना पिकाला अकस्मात आग

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या पडसाड येथे अंदाजे 10 एकरातील चना पिकाला आग लागल्याची घटना नुकतीच निदर्शनास आले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव राजु उमराव झंझाड असे आहे.

सदर नुकसानग्रस्त शेतकरी हा गारला गावातील रहिवासी असून पडसाड येथे शेती आहे शेतात पिकवलेले 10 एकरातील चना पिकाला अचानक आग लागल्याची घटना घडल्याची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला सुदैवाने शेतात कुणी नसल्याने जीवितहानी टळली असली तरी चना पीक जळून पूर्णता भसमसात झाले .

संदीप कांबळे कामठी