Published On : Fri, Feb 14th, 2020

रामटेक येथे श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.

सुवर्णकार महीला मंडळाचा स्तुत्य उपक्रम.रामटेक
– महिला मंडळातर्फे प्रभात फेरीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.रामाळेश्वर देवस्थान येथून गांधी चौक मार्गे श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांची पालखी यात्रा काढण्यात आली. पालखिचा प्रारंभ ढ़ोल ताशाच्या गजरात करन्यात आला.यावेळी महिला , पुरुष मंडळी , जेष्ठ नागरिक तसेच बालगोपाल यांनी समयोचित उत्क्रुष्ट वेशभुषेनिशी हिरीरीने भाग घेऊन पालखीयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या पालखीयात्रेचे समारोपन किराड भवन येथे करण्यात आले. सुवर्णकार महीला मंडळाच्या अध्यक्षा प्रविणा संजय मर्जिवे यांचे मार्गदर्शनाखाली महीला मंडळाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी भजन ,किर्तन तसेच विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महाप्रसाद व गोपालकाल्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

ह्यावेळी अँड.महेंद्र येरपुडे , संजय टेटे ,केशव चित्रीव, उमाकांत मर्जिवे,सुरेश टेटे, मिलिंद टेटे ,यशवंत मर्जिवे, प्रमोद निनावे , पप्पू ढोमने ,जयंत खापेकर ,संजय भुजाडे,मिथुन मर्जिवे, आदि समाजबांधवांचे सहकार्य लाभले .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सुवर्णकार महिला मंडळाच्या सचिव निता टेटे ,मंजिरी येरपुडे , आरती ढोमने,मंदा मर्जिवे , संगीता रोकडे ,शुभांगी कुर्वे , कुंदा मर्जिवे,विभा गुरव,शैलजा निनावे,स्नेहलता चित्रीव, दीपाली गुरव, किरण कावले व समाजबांधवानी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मोलाचे सहकार्य केले. रामटेक सुवर्णकार महिला मंडळाने पुढाकार घेऊन नरहरी महाराज पुण्यतिथीचा उत्सव यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.