Published On : Fri, Feb 14th, 2020

कार्यालयीन वेळेवर कर्मचारी हरविले

Advertisement

प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

कन्हान : ग्रामीण भागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची भूमिका नागरिकांना चौविस तास सेवा देण्याची असते मात्र कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शोभेची वस्तू ठरत असून नागरिकांना प्राथमिक उपचारा पासून वंचित राहावे लागत आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पारशिवनी तालुक्या अंतर्गत येणारे कन्हान इथे जवळपास वीस बेडचे मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ज्या मुळे परिसरातील तीस गावातील नागरिक येथे प्राथमिक उपचारासाठी येथे येतात.


तर नॅशनल हायवे क्रमांक ४४ व नॅशनल हायवे क्रमांक ७ नजीक असल्याने अपघात झाल्यास अपघात ग्रस्थाना प्राथमिक उपचारासाठी याच रुग्णालयात आणावे लागते, अपघातातिल इसमासाठी प्रथम तास हा अमरीत असतो तर या तासात त्यांना प्राथमिक उपचार मिळाले नाही तर त्यांचे जीव जाण्याची दाट शक्यता असते मात्र हे जाणून सुद्धा कन्हान येथील आरोग्यकेंद्रात कार्यालयीन वेळेवर कर्मचारी नेहमीच अनुपस्थित असतात ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे असाच प्रकार बुधवार दुपारी झाला असून बंद टोल नाक्या जवळ एका युवकाला फिट येऊन दुचाकी अपघातात त्याच्या डोक्याला मार लागले त्याला काहींनी मदद करून कन्हान रुग्णालयात आणले असता रुग्णालयात एकही कर्मचारी व डॉक्टर उपस्थित नोव्हतें ज्या मुळे उपचार केल्याविना त्यांना परत जावे लागले, सुदैवाने अपघातातील युवक शिवनगर कन्हान येथील रहवाशी असल्याने त्याला त्याच्या घरी पोहचविण्यात आले मात्र झालेल्या प्रकारामुळे रुग्णालयातील कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण होत असून कर्मचाऱ्यांच्या हरगर्जी मुडे एखादी जीव हानी झाल्यास त्यांच्यावर कारवाही करण्याची मागणी नागरिक करीत आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement