रामटेक- रामटेक तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी ३० जानेवारी पासून विविध मागण्या पुर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या आर्थिक व सेवाविषयी प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने वारंवार शासनाकडे निवेदने दिलेत पण शासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे दोन्ही संघटनेच्या संयुक्त निर्णयाने ३० जानेवारी २०२०पासून मागण्या पुर्ण होईपर्यंत विविध टप्प्याच्या स्वरूपात कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनातील आर्थिक व सेवाविषयक मागण्या अशा आहेत.
साझा पुनर्रचनेनुसार नवनिर्मित तलाठी साझाची अंमलबजावणी करणेबाबत. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटॉप व प्रिंटर मिळावा. वेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्यात याावी.
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराचा टक्के मेहनताना वेतनात मिळावा.तलाठी कार्यालयाचे प्रलंबित भाडे मिळावे. कोतवालांचे रिक्त पदे भरणेबाबत. निवडणुकीतील कामाचा अतिकालीक भत्ता मिळणेबाबत.प्रधानमंत्री किसान व महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुढील कामे सविनय नाकारणेबाबत.अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीमध्ये होणाऱ्या त्रासाबाबत.स्थायीकरण करणेबाबत.
महसूल मंडळ अधिकारी यांना पीक कापणी प्रयोगाचे समप्रमाणात विभागणी करणेबाबत. अशा मागण्या १२ फेब्रुवारी पर्यंत पुर्ण न झाल्यास १३ फेब्रुवारी २०२०पासून सामुहिक रजेवर जाण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी विदर्भ पटवारी संघ रामटेकचेे अध्यक्ष निलेश ठाकूर,सचिव मुकेश बागंर, मंडळ अधिकारी प्रमोद जांभूळे,शोभेलाल कोडवते, तलााठी संभा चंदनबावणे , महेश ठाकरे संगीता बोराडे ,मोरेश्वर सोनटक्के ,आमिर खान, प्रियंका घुगे नालंदा खोब्रागडे ,बापूराव सिरसाम ,हर्षणा रोडगे विनोद मुंडेे ,भूषण निखाडे आदीनी आंदोलन व मागण्यांचे निवेदन रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटियारेे व तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना दिले.