Published On : Fri, Jan 31st, 2020

मनपा करणार ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन’ महोत्सवाचे आयोजन

विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांची पत्रकार परिषदेत माहिती

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन’ साजरा करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये मनपातर्फे तीन दिवसीय ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन’ महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Gold Rate
16 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,700 /-
Gold 22 KT ₹ 1,03,000 /-
Silver/Kg ₹ 1,29,800/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी हनी बी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रियांशी हरदीप, अहिल्याबाई होळकर बहुद्देशिय शिक्षण संस्थेचे सचिव नितीन गजभिये, आपण बहुद्देशिय संस्थेचे पदाधिकारी प्रसन्ना अटाळकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम म्हणाले, तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, बुद्ध ज्ञान प्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी झाले. संयुक्त राष्ट्र संघानेही हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेतर्फे पहिल्यांदाच तीन दिवसीय ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन’ महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

आयोजनासंबंधी ५ फेब्रुवारीला महापौरांच्या अध्यक्षतेत बैठक
‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन’ महोत्सवाच्या आयोजनाची पूर्वतयारी आणि कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी येत्या ५ फेब्रुवारीला मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

बैठकीत सत्तापक्ष नेते संदीप जाधव, माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके उपस्थित राहतील. बैठकीला समाजातील घटकांच्या हितासाठी कार्यरत सर्व मान्यवरांना प्रामुख्याने आमंत्रित करण्यात येणार आहे. बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांकडून महोत्सवाचे स्वरूप, कार्यक्रमाची योजना या संदर्भात सूचना मागविण्यात येणार आहेत. या सूचनांनुसार पुढे कार्यक्रमाची रचना केली जाईल. शहरात विविध सामाजिक विषयांसंबंधी कार्यरत सर्व मान्यवरांनी ५ फेब्रुवारीला बैठकीत विशेषत्वाने उपस्थित राहावे, असे आवाहनही विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी केले.

Advertisement
Advertisement