Published On : Wed, May 22nd, 2019

रामटेक व नागपूर मतदारसंघातील मतमोजणीसाठी 888 कर्मचारी

Advertisement

प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी 8.30 वाजता होणार सुरुवात

नागपूर: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवार दिनांक २३ मे रोजी सकाळी 8.30 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 6.30 वाजता मध्यवर्ती स्ट्राँगरुममधून विविध उमेदवारांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीन्स मतमोजणीसाठी आणण्यास सुरुवात होणार आहे. मतमोजणीची व्यवस्था पूर्ण झाली असून, यासाठी 888 कर्मचारी व अधिकारी यांच्या नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिली.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रामटेक व नागपूर मतदारसंघातील मतमोजणी कळमना मार्केट यार्ड परिसरातील दोन हॉलमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रत्यक्ष मतमोजणी केंद्राला भेट देऊन घेतला.

यावेळी रामटेक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा व संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते.

रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी फ्रुट ऑक्शन हॉल क्रमांक 3, तर नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी फ्रुट ऑक्शन हॉल क्रमांक 4, पंडीत जवाहरलाल नेहरु कळमना मार्केट यार्ड , चिखली ले- आऊटमध्ये होणार आहे.

20 टेबलनुसार होणार मतमोजणीच्या फेरी

रामटेक लोकसभा मतदारसंघातील 2364 मतदार केंद्रावर विधानसभानिहाय मतमोजणीच्या 20 टेबलनुसार फेरी होणार असून, त्यामध्ये काटोल विधानसभा मतदारसंघातील 328 मतदान केंद्रांवरील मतमोजणीच्या 17 फेरी होणार आहेत. तर सावनेरमधील 367 मतदान केंद्रावर 19 फेरी, हिंगणामधील 436 मतदान केंद्रांवर 22, उमरेडमधील 384 मतदान केंद्रावर 20, कामठीमधील 492 मतदानकेंद्रांवर 25 आणि रामटेकमधील 357 मतदान केंद्रावर 18फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातील 2065 मतदार केंद्रावर विधानसभानिहाय मतमोजणीच्या 20 टेबलनुसार फेरी होणार असून, त्यामध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 378 मतदान केंद्रांवरील मतमोजणीच्या 19 फेरी होणार आहेत. तर दक्षिणमधील 349 मतदान केंद्रावर 18 फेरी, पूर्वमधील 336 मतदान केंद्रांवर 17, मध्यमधील 305 मतदान केंद्रावर 16, पश्चिममधील 332 मतदानकेंद्रांवर 17 आणि उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील 365 मतदान केंद्रावर 19 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

Advertisement
Advertisement