माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
नागपूर: माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (ता.२१) नागपूर महानगरपालिकेमध्ये अभिवादन करण्यात आले. महापौर नंदा जिचकार, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी देशभर दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरी करण्यात येते. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांनी उपस्थित सर्व कर्मचारी व अधिका-यांना दहशतवाद विरोधी दिनाची शपथ दिली.
यावेळी नगरसेविका नेहा निकोसे, नगरसेवक दिनेश यादव, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, सहायक आयुक्त मिलींद मेश्राम, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, सहायक दिलीप तांदळे, राजेश निकोसे यांच्यासह मनपाच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.
