Published On : Thu, Apr 2nd, 2020

रेशीमबागेतील श्रद्धास्थानात नामस्मरणात रामनवमी संपन्न

स्थानिक रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान द्वारे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीरामनवमीनिमीत्य नामस्मरणाने प्रभु रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा झाला.

यावेळी कोरोना विषाणु च्या वाढत्या संक्रमणामुळे पालखीचे आयोजन नसल्याने फक्त श्रद्धास्थानातील सेवकांनी श्रद्धास्थानचे संयोजक गिरीशजी वराडपांडे यांचे उपस्थितीत कोरोना विषाणु संक्रमणातुन मुक्तीसाठी व सर्व भारतीयांच्या रक्षणासाठी १३ वेळा श्रीरामरक्षा व श्री मारुतीस्तोत्राचे सामुहीक पठण करण्यात आले .

दुपारी प्रभु रामचंद्रांचा १२ वाजता श्री रामजन्म करण्यात आला व रामचंद्रांना मंगल अभिषेक मंगल आरती करण्यात आली.


या प्रसंगी डाॅ श्रीरंग वराडपांडे , नरेंद्र गोरले , बाळ भेंडे ,सुभाष मानकर , नरेश ईटनकर ,मंगला पोटे, ममता मानकर, चित्रा मानकर, समृद्धी वराडपांडे,स्वरश्री वराडपांडे, वैजयंती अटाळकर,आदींनी सहभाग घेतला.