Published On : Thu, Apr 2nd, 2020

कोरोना तणावात असलेल्यांसाठी ‘डॉक्टर मला बोलायचं आहे’ उपक्रमाची आजपासून सुरुवात

* 33 नामवंत मानसोपचार तज्ज्ञांचा सहभाग

* आपल्या शंकांचे होणार निरसन

* तणाव व्यवस्थापनाचा मिळणार सल्ला

* दहा तास उपलब्ध होणार सेवा


नागपूर: कोरोनाच्या आजाराने सर्वत्र भितीचे वातावरण असून यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत अशा परिस्थितीत जनतेमध्ये भिती व गैरसमजामुळे मानसिक ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत असलेल्यांसाठी ‘डॉक्टर मला बोलायचं आहे’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील मानसोपचार तज्ज्ञ आपल्या शंकांचे तसेच यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक परिस्थितीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

नागपूर सायक्रियाटीक असोसिएशन व सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर मंडळ यांच्या संयुक्तपणे ‘डॉक्टर मला बोलायचं आहे’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.

कोरोनाच्या भितीमुळे मानसिक तणावाचा मुकाबला करण्यासाठी थेट मानसोपचार तज्ज्ञ आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. शहरातील नामवंत डॉक्टरांनी यासाठी आपला वेळ उपलब्ध करुन दिला आहे. नागरिकांनी त्यांच्या दिलेल्या वेळेवरच दूरध्वनीवर समुपदेशन व मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी तज्ज्ञ डॉक्टर यांना दिलेल्या वेळेतच दूरध्वनी करायचा आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत यासाठी प्रत्येक तासाला वेगवेगळे डॅाक्टर आपल्याला मार्गदर्शन व समुपदेशन करणार आहेत. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी केले आहे.

नागरिक उद्भवलेल्या तणावाशी कोरोनामुळे मुकाबला करु शकतात यासाठी विनामूल्य समुपदेशन व मार्गदर्शन मिळणार आहे. डॉक्टरांचे नाव व त्यांची वेळ, दूरध्वनी खालीलप्रमाणे आहेत.