Published On : Sat, May 19th, 2018

केंद्रीय सामाजिक न्‍याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्‍या हस्‍ते दिव्‍यांग व्‍यक्तिंना सहाय्यकारी उपकरणाचे वितरण

Advertisement

Ramdas Athawale Distributed equipment

नागपूर: केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्‍या अंतर्गत नागपूर येथील संयुक्‍त क्षेत्रीय केंद्र (सी.आर.सी.) व नागपूर महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभागाच्‍या वतीने स्‍थानिक क्रीडा प्रबोधीनी सभागृह, यशवंत स्‍टेडीयम येथे दिव्‍यांग व्‍यक्‍तींना सहाय्यकारी उपकरणांचे वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला.

याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दिव्यांग व्‍यक्तिंना साहित्‍य वितरण करण्‍यात आले. यावेळी सी.आर.सी.चे संचालक जगोटा, महानगरपालिकेच्‍या शिक्षणाधिकारी मेळपल्‍लीवार, पं. दीनदयाल उपाध्याय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विरल कामदार प्रामुख्‍याने उपस्थित होते.

Gold Rate
10 May 2025
Gold 24 KT 94,700/-
Gold 22 KT 88,100/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आपल्‍या देशात सुमारे 2 कोटी दिव्‍यांग व्‍यक्‍ती आहेत. दिव्‍यांग व्‍यक्‍तींच्‍या सक्षमीकरणाकरिता शासकीय नोकरीमध्‍ये 4% तर शैक्षणिक संस्‍थामध्‍ये 5% आरक्षणाची सुविधा केंद्र शासनातर्फे दिली जात आहे. गत 4 वर्षात दिव्‍यांग व्‍यक्‍तींसाठी उपकरण वितरणाचे सुमारे 7 हजार शिबीरे आयोजित झाली असून त्‍याद्वारे सुमारे 9 लक्ष व्‍यक्‍तींना साहित्‍य वितरण झाले आहे, अशी माहिती आठवले यांनी यावेळी दिली.

Ramdas Athawale Distributed equipment

सी.आर.सी. दिवसेंदिवस दिव्‍यांगजनाच्‍या कल्‍याणासाठी असे कार्यक्रम 12 जिल्‍हयांमध्‍ये राबवत आहे. इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्‍या मार्फत बालकांना अपगंत्‍व येऊ नये या करिता सी.आर.सी. प्रयत्‍न करत आहे. पुढील काळात, शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्‍या परिसरात सी.आर.सी.ची कायमस्‍वरूपी ईमारत उभी राहील,अशी माहिती केंद्राचे संचालक जगोटा यांनी दिली.

यावेळी व्हिल चेयर, क्रचेस, वाकर, रोलेटर काठी, सी.पी. चेयर,कॉर्नर सीट, डिजीटल श्रवण यंत्र, शैक्षणिक साहित्‍य, डेजी प्‍लेअर या सहाय्यकारी उपकरणाचे वितरण मंत्री महोदयाच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रसंगी सी.आर.सी. चे पदाधिकारी, व्दिव्‍यांग मुलांचे पालक उपस्थित होते.

Ramdas Athawale Distributed equipment

Advertisement
Advertisement