नागपूर: नागपूर महानगरपालिका प्रभाग क्र. १५ धरमपेठ आंबेडकर नगर वसाहतीतील जुनी ड्रेनेज लाईन बदलून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (ता. १९) आंबेडकर नगर बौद्ध विहार येथे महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास गजघाटे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधाकर देशमुख, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, नगरसेविका रूपा राय, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, निशांत गांधी, प्रभाग अध्यक्ष अमर पारधी उपस्थित होते.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर शहरातील अनेक ड्रेनेज लाईन जुन्या झाल्या आहेत. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आता आवश्यक त्या ठिकाणच्या ड्रेनेज लाईन बदलण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर शहराला नुकताच स्वच्छ सर्वेक्षणमध्ये राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाला. लोकांची मानसिकता आता बदलत आहे. नागपूर शहर स्वच्छ, सुंदर करण्यात लोकसहभाग आवश्यक आहे. पुढील वर्षी स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर प्रथम क्रमांकावर येण्यासाठी आता पुन्हा एकदा सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सुधाकर देशमुख म्हणाले, नागपूर शहराची हवा स्वच्छ आहे. नागपूर शहर हिरवे आहे. लोकांची साथ मिळाली तर स्वच्छ पुरस्कारात नागपूर देशात अव्वल येईल, यात शंका नाही.
कार्यक्रमाला प्रमोद थूल, प्रसन्ना राऊत, शैलेंद्र वाजपेयी, स्मृती राघव, श्रीमती पाटील, हंसराज सूर्यवंशी, संजय कश्यप, मनोज हिरणवार, हरिभाऊ फाटक, अनिल जैसवाल, ॲड. प्रकाश दुर्गे, स्वप्नील मसराम, महेश रामडोहकर, योगेश सोनकर्रे, गुड्डू गुप्ता, राजेश कनोजिया, श्यामलता नायडू, किशोर कनोजिया, अनिल गोरे, श्रीमती भोयर उपस्थित होते.
