Published On : Sun, May 20th, 2018

मुंबई सेंट्रल ते अक्कलकोटसाठी शिवशाही स्लीपर

Shivshahi Bus Accident

File Pic

मुंबई : एसटी महामंडळाने मुंबई ते सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मार्गावर शिवशाही एसी स्लीपर सेवा सुरू केली आहे. त्यामुळे अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविक प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. ही बस मुंबई सेंट्रल ते अक्कलकोट मार्गावर धावणार आहे.

मुंबई सेंट्रल बस आगारातून ही बस दररोज सायंकाळी ६:३० वाजता निघून पुणे, सोलापूर मार्गे अक्कलकोटला पहाटे ४:३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही बस अक्कलकोटवरून रात्री ९:३० वाजता निघेल. बसचे तिकीट दर १ हजार ४० रुपये इतके आहे. बसमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय, मोबाइल चार्जिंग प्लग, उशी, ब्लॅंकेट, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरा या सुविधा आहेत. प्रवाशांना बसचे आगाऊ आरक्षण www.msrtc.gov.in वरुन करता येईल. त्यासह, msrtc reservation app मधूनही प्रवासी स्मार्ट फोनवरून आरक्षण करू शकतात.