Published On : Tue, Jun 16th, 2020

रुग्णवाहिकेचा कारभार रामभरोसे !

Advertisement

पायलटकडे रुग्णांची जबाबदारी
तीन पैकी एकच डॉक्टर सेवेत


बेला: 108 नंबर वरून ुरूग्णांच्या मदतीला धावून जाणाऱ्या शासकीय रुग्णवाहिकेचा कारभार रामभरोसे होत चालला आहे. यातून डॉक्टरांचे कमतरतेमुळे इस्पितळात जाणाऱ्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. डॉक्टरच्या गैरहजेरीत चालक पायलट वर रुग्णाच्या औषधोपचाराची जबाबदारी टाकण्यात येत आहे. अशावेळी रुग्णाचे जीवास धोका झाल्यास त्यास कोण जबाबदार राहील? हा प्रश्न पायलट चालक यांना पडला आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या एन आर एच एम. योजनेअंतर्गत भारत विकास ग्रुप मार्फत रुग्णवाहिकेची यंत्रणा व व्यवस्था राबवल्या जाते. आरोग्य विभागातील एआरसी कक्ष 108 कॉलची हाताळणी व पाहणी करत असते. त्यांचेकडे कॉल गेल्यावर डॉक्टर नसतानाही पायलटचे भरोशावर ॲम्बुलन्स पाठवण्यात येते. डॉक्टर नसल्याने पायलटने रुग्ण देण्यास नकार दिला तर दमदाटी करून यासी मनमानीने गैरवर्तन करतात अशी पायलट चालकांची ओरड आहे. राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात सरकारी आरोग्य केंद्रात हा गैरप्रकार सर्रास सुरू असल्याची खबर आहे.

बेला प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर कामकाजासाठी तीन डॉक्टरांचे पद मंजूर आहे. परंतु डॉक्टर महेश जोडे नामक एकच डॉक्टर कार्यरत आहे. ते नागपुरातून ये-जा करतात त्यामुळे हप्त्यातून दोनच दिवस ते रुग्णवाहिकेचे वर सेवेत दिसतात. धोंड डॉक्टर नसल्याने पायलटची रुग्णांची सेवा ॲम्बुलन्स द्वारे करतात. पायलट ॲम्बुलन्स चालवताना रुग्णवाहिकेच्या आतील गंभीर रुग्णास औषधोपचाराची सेवा कशी देत असेल? याची कल्पना न केलेली बरी!