Published On : Thu, Mar 14th, 2019

राम नगर (GSR) स्वच्छता १५ मार्च रोजी, & राम नगर जलकुंभ (ESR) ची स्वच्छता १६ मार्च रोजी

Advertisement

जलकुंभ स्वच्छताकाळात टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील बंद

नागपूर: मनपा-OCW यांनी राम नगर जलकुंभ (GSR) ची स्वच्छता १५ मार्च (शुक्रवार) रोजी तर राम नगर जलकुंभ (ESR) ची स्वच्छता १६ मार्च (शनिवार) रोजी करण्याचे ठरविले आहे. दोन्ही जलकुंभ DHARAMPETH झोन अंतर्गत येतात.

राम नगर जलकुंभ (GSR)च्या स्वच्छतेमुळे १५ मार्च (शुक्रवार) रोजी खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील: कॉरपोरेशन कॉलनी, डागा लेआउट, शंकर नगर, काचीपुरा एमएसईबी, भगवाहर लेआउट, धरमपेठ विस्तार, त्रिकोणी पार्क, शिवाजी नगर, गांधी नगर, मामा रोड धरमपेठ, माता मंदिर रोड

राम नगर जलकुंभ (ESR)च्या स्वच्छतेमुळे १६ मार्च (शनिवार) रोजी खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील: अंबाझरी लेआउट, वर्मा लेआउट, यशवंत नगर, समता लेआउट, अंबाझरी टेकडी झोपडपट्टी, सुधम नगरी झोपडपट्टी, मुजेबाबा लेआउट, सेवा नगर झोपडपट्टी, पांढराबोडी झोपडपट्टी, अजय नगर झोपडपट्टी, हिल टॉप, संजय नगर सिंगल गली, बाजीप्रभू नगर, राम नगर, गोकुलपेठ, मरारटोली, तेलंगखेडी, तिलक नगर, भरत नगर, हिंदुस्तान कॉलनी

शटडाऊन काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.