Published On : Tue, Aug 4th, 2020

कोविड योध्दयांना राखी बांधून उपमहापौर व्दारे आगळे-वेगळे रक्षाबंधन

Advertisement

नागपूर: कोरोना (कोविड-१९) ची जोखीम पत्करुन शहरातील कोरोना संक्रमणा विरुध्द लढा देण्यासाठी म.न.पा. चे वैद्यकीय अधिकारी व चमू मैदानात आहे.

रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे व त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रभाग-२६ शक्तीमाता नगर, हनुमान मंदीराजवळील त्यांचे जनसंपर्क कार्यालयाचे परिसरात डॉ. गजानन पवाने यांचेसह १० कोविड योध्दयांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यात येवून त्यांना मास्क, सॅनिटायझर, श्रीफळ व गौरवपत्र देण्यात आले. याप्रसंगी रेवती गाठीबांधे, शिला मैत्रे, किरण गायकवाड, अमिषा पटले आदी उपस्थित होत्या.

Advertisement
Advertisement