Published On : Thu, Aug 11th, 2022

हिंदू विद्या भवन शाळेत राखी कार्यशाळा साजरी

Advertisement

नागपुर – हिंदू विद्या भवन, शांतीनिकेतन, हनुमान नगर, नागपूर येथे नुकतीच राखी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संंस्थेच्या विश्‍वस्त मा. सौ. महालक्ष्मी जोशी प्रामुख्याने उपस्थित होत्या. या कार्यशाळेत टाकाऊ व नैसर्गिक वस्तुंपासून राखी कशी बनवायची ते प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध पाने, फुले, मनी, आगपेटीच्या काड्या, विविध रंगीत कागद यापासून सुंदर राख्या तयार केल्या.

यासाठी मार्गदर्शिका म्हणून सौ. शिल्पा मुंजेवार यांनी विशेष परिश्रम घेतले. मा. सौ. महालक्ष्मी जोशी यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे निरीक्षण केले व त्यांचे कौतुक केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक सौ. रश्मी कुर्जेकर यांनी केले तर संचालन सौ. तेजस्विनी पंचबुधे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. उज्ज्वला राऊत यांनी केले.

कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिपिका वाठ, शिक्षकांमध्ये कु. कोमल फिस्के, सौ. केतकी नागरीकर, सौ. मनिषा मराठे, कु. ॠतुजा जिवने, कु. पुजा बावने, सौ. रूपाली ढोरे, सौ. मंजुश्री आटे, सौ. प्रिती जांभुळकर, सौ. जयश्री कसरे, कु. शैला कुकडे, सौ. श्‍वेता नेवारे, कु. दिव्या कोलते, श्री रितेश पंडेल, डॉ. सौ. मेधा मोहरील, सौ. अर्चना दुरगकर, सौ. भावना इंगळे आदि उपस्थित होते. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यशाळा आनंदात संपन्न झाली.