Published On : Tue, Aug 4th, 2020

धार्मिक स्थळ राखी तलाव बनला मद्दपियांचा अड्डा

– एकीकडे योगासन तर दुसरीकडे कचरा व गंदगी चे साम्राज्य,राखी तलावाला आले मिनी बियर बार चे स्वरूप,तलाव परीसर व पाण्यात टाकतात रिकाम्या बाटल्या व ग्लास,संबधित विभागाचे दुर्लक्ष

रामटेक– रामनगरीत कोरोना संक्रमणाच्या काळात अगदी सुरुवातीपासून महसूल,नगरपालिका,आरोग्य आणि पोलीस प्रशासन, प्रभावी आणि काटेकोरपणे कार्यरत आहेत. त्याला बहुतांश नागरिकांनी पूर्णपणे सहयोग देखील दिला आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पणे पालन करीत आहेत.

Advertisement

काही नागरिक आपल्यातील रोग प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून घरी तसेच रामटेक येथील , राखी तलावाच्या सुंदर परिसरात योग्य प्रकारचे शारीरिक अंतर ठेवून आणि सर्व त्या प्रकारच्या उपाययोजना व काळजी घेऊन एकीकडे डॉ मुरलीधर दहिरकर, अतुल सलोडकर, मंगेश बोटकुले, रुपेश कठाने, हरीश माकडे, निखिल भोगे, अरविंद जंजालकर, शंकर कटूकळे, तसेच जेष्ठ नागरिक ,महिला, तरुंन सह युवा मंडळी , आणि लहान मुले आदी योगासने व व्यायाम करतात . परंतु दुसरीकडे सर्वात दुर्दैवी बाब ही , की काही जणांनी राखी तलाव परिसराला दारू पिण्याचा अड्डा बनविलेला आहे.

राखी तलाव परिसरातील सुंदर भागात, आडोशाला,रिकाम्या दारूच्या बाटल्या,प्लस्टिकचे ग्लास,प्लास्टिकचे पाऊच,नाश्त्याची कागद जागोजागी दिसून येतात. काही मद्यापीनी तर दारू पिऊन झाल्यावर रिकाम्या बॉटल आणि ग्लास तलावाच्या पाण्यात काठावर तसेच पायरीवर फेकलेल्या आहेत. डॉ सुरेंद्र कुंभालवार ,गोविंद नवरे, वामन नायगावकर, गजानन भेदे , सुभाष भिवगडे.

ओमप्रकाश आश्टनकर, संजय भुजाडे , सुनील कोल्हे, अनिल चकोले, शेषराव बांते यांचे सह जेष्ठ नागरिक ,महिला, तरून यांचेसह मोठया प्रमाणात युवा मंडळी , आणि लहान मुले आदी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्या करीता मॉर्निंग वॉक ला जातात व योगासन व्यायाम देखील करतात परिसर स्वच्छ राहिला तर मन प्रसन्न राहील व कोरोणा सारख्या महाभयंकर बिमारीच्या काळात रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत होईल हाच एक दृष्टिकोन असतो.

राखी तलाव कडून माणापुर भोजापुर कडे जाणाऱ्या डिगगी च्या मैदान परिसरात. देखील रिकाम्या बॉटल आणि ग्लास, खाऊचे रिकामे पॅकेट्स, आदी पडले असतात.संभधीत विभागाने ह्या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लहान मुलावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्वाचे म्हणजे कोरोना संक्रमणाच्या काळात आरोग्यच्या दृष्टीने हा प्रकार घातक व धोकादायक आहे. यावर प्रशासनाने अत्यंत तातडीने पावले उचलणे गरजेचे झाले आहे.

सोबतच नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला आपल्या कोरोनातील व्यस्त जवाबदारीतून राखी तलावावर व परिसरात कडक नजर व चोख व्यवस्था करण्याचीही गरज निर्माण झाली आहे. असामाजिक तत्वांचा वापर तर होत नाही ना अशी देखील चर्चा सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये एकावयास मिळाली. एकीकडे जेष्ठ योगासन करतात तर दुसरीकडे कचरा व गंदगी चे साम्राज्य असल्याने जेष्ठ नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

आरोग्य अधिकारी रोहित भोईर यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, राखी तलाव हे धार्मिक स्थळ आहे, त्याचा उपभोग नागरिकांनी योग्य रीतीने घ्यावा, तिथे नागरिकांनी मद्यपान करू नये. व्यसन करीता प्रवेश केल्यास त्या व्यक्ती वर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Advertisement