Published On : Tue, Aug 20th, 2019

नासुप्र येथे राजीव गांधी यांची ७५वी जयंती साजरी

नागपूर : भारतात ‘इन्‍फर्मेशन टेक्‍नॉलजी आणि टेलिकॉम रेवलूशन’चे प्रणेते माझी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची ७५वी जयंती नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. नामप्राविप्र’चे अपर आयुक्त श्री. हेमंत पवार यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नासुप्र’चे मुख्य अभियंता श्री. सुनील गुज्जेलवार, नामप्रविप्रा’च्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री. लांडे, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता(प्रकल्प) श्री. प्रशांत भांडारकर, कार्यकारी अभियंता (मुख्यालय) श्री. पी.पी. धनकर आणि जनसंपर्क व सचिव-१ श्रीमती कल्पना गीते तसेच इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.