Published On : Tue, Feb 6th, 2018

निर्माणधिन रस्त्यामुळे अपघाती लोकांना मोबद्दला द्या

Advertisement


नागपूर/कन्हान: महामार्ग क्र 7 ऑटोमोटिव्ह चौक नागपूर ते कन्हान-टेकाडी बस स्टाप पर्यंत चे सिमेंट रस्ता निर्माणधिन काम केसीसी कंपनी करित आहे. या निर्माणधिन महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. हे निर्माणधिन काम योग्य प्रकारे होत नसल्याने, सुरक्षा, सुचना फलक, दिशा दर्शक लावत नसल्याने व व्यवस्थित रस्ता वळणे न काढल्याने ये-जा करतांना अपघात होत असून नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. अपघात झाल्यानवर रुगंवाहिनी सुद्धा वेळेवर येत नाही.

निर्माणधिन रस्ता सिमेंटचा असल्यानी पाणी वेळेवर व व्यवस्थित न टाकत असल्याने धूळीचे वायुप्रदुषण होत आहे. ज्या मुळे नागरिकांना हृदयरोग व संबधित आजार होण्याचे प्रमाण वाढत आहेत.रोडावरील बारीक गिट्टीने व रॉखेच्या धुळीमुळे पायदळ, मोटारसायकल चालक आपल्या वाहनासह खाली पडुन अपघात होऊन जिवहानी, हाथ,पाय टूटुन शारिरीक अपंगत्वास बळी पडत आहेत.

हाथ मजूरी करणारे रुग्णालयात उपचार कसा करणार असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर होत आहे.यात ज्यांचे प्राण गेले त्याच्या परिवाराला साथ लाख रुपये व अपघातात अपंग झालेल्याना अपघात नुकसान भरपाई म्हणून मोबदला देण्यात यावा. काम शुरू असतांना व्यवस्थित काम करून सुरक्षा फलक व इतर व्यवस्था करावी जेणेकरून निर्दोष प्रवाशांना व परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही. यांची दक्षता निर्माणधिन केसीसी कंपनीने घ्यावी. या लोकहितार्थ मागणीचे निवेदन.महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष सौ.मोनाताई धुमाळ (जगम) यांनी जिहाधिकारी नागपूर यांना दिले आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास मनसे व्दारे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिष्टमंडळात मनसे उपजिल्हा अध्यक्ष यूवराज नागपुरे, जीतू धुमाळ, रोशन बंड, नितेश पाली, आकाश खडसे , अमित घारड, अनिल आंबिलडूके अादी कार्यकर्ता उपस्थित होते.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement