Published On : Tue, Jun 26th, 2018

प्लॅस्टिकबंदीवर मुख्यमंत्री गप्प का ? – राज ठाकरेंचा सवाल

मुंबई- मनसेचा प्लॅस्टिकबंदीला विरोध नाही पण कोणतेही पर्यायी व्यवस्था नसताना इतकी घाई कशासाठी असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. तसेच प्लॅस्टिकबंदीबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन कायम आहे त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारचा आहे की फक्त संबंधित एका खात्याचा आहे अशी विचारणाही केली.

प्लास्टिक बंदीवर बोलण्यासाठी राज ठाकरे यांनी निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पक्षाची भूमिक मांडणारा मेसेज फिरत असून प्लास्टिक पिशव्या वापरल्याच पाहिजेत ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही असं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीसाठी इतकी घाई का ? असा सवाल विचारत हा निर्णय सरकारचा आहे की विशिष्ट खात्याचा ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला.
“23 जून प्लास्टिक बंदी सुरू झाली, अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू झाली मग 5000 रुपयांचा दंड मंग 10 हजारांचा दंड आणि मग शिक्षा वगैरे असं सुरू झालं. मात्र लोकांमध्ये संभ्रम व भय आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.

प्लास्टिक बंदी आणायची तर जगभरात अशी बंदी आणताना काय पद्धत असते असा सवाल विचारत राज यांनी टिका केली.

प्लास्टिकनं संपूर्ण आयुष्य गुंडाळलंय आणि आता त्याच्या जागी काय याबाबत संभ्रम असल्याचे ते म्हणाले. प्लास्टिक बंदीही सरसकट नसल्याचं सांगताना सगळ्या प्लॅस्टिक बंदी हवी ना असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला व वेफरच्या पाकिटाचं प्लास्टिक कसं चालतं असं ते म्हणाले.

या सगळ्या प्रक्रियेत प्लास्टिक संदर्भात घाई काय होती असा सवाल विचारत राज ठाकरे यांनी विचारलं की लोकांना नक्की काय करायचं प्लास्टिकच्या ऐवजी याचीच माहिती आहे का? तर काय करायचं असं विचारलं तर वरळीला जा, प्रदर्शन लागलंय तिथं माहिती मिळेल असं सांगण्यात आलं. परंतु याची लोकांनाच कल्पना नसल्याचा आरोप राज यांनी केला. पुढे जात सगळेच जण खिशात पाच हजार रुपये घेऊन फिरत नाहीत अशी खिल्लीही त्यांनी उडवली.