Published On : Thu, May 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज ठाकरे-बावनकुळे भेटीने राजकीय चर्चांना उधाण; ‘शिवतीर्थ’वरील चर्चेची रंगली जोरदार चर्चा

मुंबई : राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चांना हवा देणारी महत्त्वाची भेट गुरुवारी मुंबईत पार पडली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, या भेटीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भेटीनंतरचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

Gold Rate
May 07- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,200 /-
Gold 22 KT ₹ 1,41,500 /-
Silver/Kg ₹ 2,53,900/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, भेटीनंतर ‘शिवतीर्थ’बाहेर माध्यम प्रतिनिधींनी बावनकुळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया न देता ते त्वरित रवाना झाले. त्यामुळे या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत उत्सुकता अधिकच वाढली आहे.

या अनपेक्षित भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, पुढील काही दिवसांत याबाबत अधिकृत भूमिका समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement