Published On : Thu, May 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत कारवाई;वेबसाइटच्या माध्यमातून सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय!

Advertisement

नागपूर– शहर गुन्हे शाखेच्या सोशल सिक्युरिटी ब्रँचने (SSB) ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत मोठी कारवाई करत ऑनलाइन माध्यमातून चालवला जाणारा देहविक्रीचा रॅकेट उद्ध्वस्त केला. या कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘नागपूर इंडिका सर्व्हिसेस’ नावाच्या वेबसाइटच्या माध्यमातून हा अवैध व्यवसाय सुरू होता. आरोपी महिलांना झटपट पैसे आणि आर्थिक फायद्यांचे आमिष दाखवून देहविक्रीच्या व्यवसायात ढकलत असल्याचे तपासात समोर आले आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल राहुल डिलक्सजवळ असलेल्या OYO फ्लॅगशिप कृष्णा हॉटेलवर ६ मेच्या रात्री उशिरा ही छापेमार कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथील दोन महिलांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३(२)(३) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वयेही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राज’ नावाचा झारखंडमधील एक संशयित या रॅकेटचा सूत्रधार असल्याचा संशय असून, संबंधित मोबाइल क्रमांक आणि वेबसाइटच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे. कारवाईदरम्यान रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण ६ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सुटका करण्यात आलेल्या महिलांची वैद्यकीय तपासणी करून पुढील चौकशीसाठी त्यांना गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई सोशल सिक्युरिटी ब्रँचचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मानव तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाविरोधात नागपूर पोलीस आयुक्तालयाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत ही मोहीम राबवण्यात येत आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges