Published On : Wed, Sep 20th, 2017

मुंबईसह पुण्यात पावसाचा जोर; वाराणसी-मुंबई विमान धावपट्टीवर घसरले, 6 रेल्वे एक्स्प्रेस रद्द


मुंबई:
गेली दोन दिवस संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह कोकणसह पुणे-नाशिक पट्ट्यातील सह्यादी रांगेत मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही तासांत या भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबईत धावपट्टीवर विमान घसरले
मंगळवारी रात्री लो व्हिजिबिलिटीमुळे जवळपास 56 उड्डाणे रद्द करण्‍यात आली आहे. दुसरीकडे, वाराणसीहून मुंबईला आलेले स्पाइस जेट विमान लॅंडिंग करताना धावपट्टीवर घसरुन चिखलात फसले. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. परिणामी दोन्ही धावपट्ट्यांवरील उड्डाणे बंद करण्‍यात आले आहेत. पावसाने 15 विमानंचे उड्डाण रद्द करण्‍यात आली आहेत.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही.

सिंधुदुर्गमध्ये पुरसदृश्य स्थिती
दुसरीकडे, कोकणात सिंधुदुर्गमध्ये पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत‍ रेल्वे रुळावर पाणी आल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तसेच छत्रपती शिवाजी एअरपोर्टच्या धावपट्टीवरही पाणी साचले आहे. दरम्यान, मुंबईत 29 ऑगस्टला एका दिवसात 300 मिलीमीटर पाऊस झाला होता.

मध्य महाराष्ट्रात संततधार, विदर्भात तुरळक तर मराठवाड्यात काहीच ठिकाणी पाऊस पडत आहे. मंगळवारी मुंबई, कोकणसह पुणे व उर्वरित महाराष्ट्रात पावसाची संततधार होती. मुंबईत मंगळवारी रात्री पाणी तुंबले होते. त्यामुळे मुंबईकरांना 29 ऑगस्टच्या पावसाच्या आठवणीनेच धडकी भरली होती.

मंगळवारी रात्री 8 ते 11 या तीन तासांत तब्बल 213 मिमी पावसांची नोंद झाली. या पावसामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. आज सकाळपासून पावसाची संततधार कायम असल्याने मुंबईहून होणारी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर सुरक्षेची खबरदारी म्हणून मुंबई व ठाणे शहरातील शाळा- महाविद्यालयांना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केला हायटाइड
न्यूज एजन्सी एएनआयनुसार, मुंबई एअरपोर्टवरील दोन रनवे बंद करण्यात आले आहे. आतापर्यंत 56 विमानांना मार्ग बदलण्यात आला आहे. गोवा, बंगळुरु, दिल्ली आणि हैदराबादकडे ही विमाने डायव्हर्ट करण्यात आली आहे.

– मंगळवारी रात्री उशीरा झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले.
– ठाणे(वेस्ट) पोखरण मार्गावरील शिव कृपा सोसायटीजवळ टेम्पो आणि दोन घरांवर झाड कोसळले.
– ‘बुधवारी दुपारी 12.03 ते सायंकाळी 06.04 वाजेपर्यंत हायटाइड’, असा अलर्ट मुंबई पोलिसांनी जारी केला आहे.
– रेल्वे रुळावर पाणी साजल्याने सेंट्रल लाइनवरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
6 रेल्वे एक्स्प्रेस रद्द, 2 चे मार्ग बदलले
– 22102 मनमाड-सीएसटीएम राज्यरानी एक्स्प्रेस
– 12118 मनमाड- एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस
– 11007 सीएसटीएम- पुणे डेक्कन एक्स्प्रेस
– 22101 सीएसटीएम- मनमाड राज्यरानी एक्स्प्रेस
– 12117 एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस
– 11010 पुणे-सीएसटीएम सिंहगड एक्स्प्रेस

या एक्स्प्रेसचे मार्ग बदलला
– 11025 भुसावल-पुणे एक्स्प्रेस
– 11026 पुणे- भुसावल एक्स्प्रेस

मुंबई अपडेट्स-
– मंगळवारी रात्रीपासून लो- व्हिजिबिलिटीमुळे आतापर्यंत 56 विमानांचे उड्डाणेरद्द
– दिल्लीहून मुंबईकडे येणारे एका विमानाचे उड्डाण रद्द
– वाराणसीहून मुंबईत पोहोचलेले स्पाईस जेटच्या विमानाचे लॅंडिग होताना चिखलात रूतल्याने घसरले, कोणतेही नुकसान नाही.
– पुढील 48 तासांत मुंबई, कोकण, ठाणे नाशिक व पुणे पट्ट्यात अतिवृष्टी होण्याचा हवामान खात्याचा इशारा.

डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार
– आज दुपारी12 वाजून 3 मिनिटांनी आणि 6 वाजून ४ मिनिटांनी हाय टाईड, पाऊस सुरूच राहिल्यास मुंबईत सखल भागात पाण्याचा साचण्याचा धोका, काळजी घेण्याचे आव्हान.
पुणे व परिसरात पावसाची काय आहेस स्थिती-
– खडसवासला धरणातून 23 हजार क्यूसेक पाणी सोडले, सिंहगड रस्ता परिसरातील घरात पाणी शिरले.
– मुळशी, पानशेत धरण परिसरात पावसांची संततधार,
– मावळ व पवना धरण परिसरात जोरदार पाऊस
– लोणावळा- खंडाळा, कार्ला भागात दोन दिवसापासून दमदार पाऊस
– पुणे ग्रामीण भागातही पावसाची दमदार खेळ.

नाशिक अपडेट-
– नाशिक परिसरात जोरदार पाऊस पडतोय.
-गोदागाठ पाण्याखाली. त्यामुळे पिंडदान करण्यासाठी आलेल्या लोकांना रस्त्यावरच पिंडदान करण्याची वेळ.
– रस्त्यावर पिंडदान सुरु असल्याने वाहतूक कोंडी. सार्वपित्री अमावस्या असल्याने देशभरातून नाशिकमध्ये भाविक दाखल झाले आहेत.
– परिस्थिती पाहून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

कोयना अपडेट
– साता-यातील कोयना धरण पूर्ण (99 टक्के) भरले आहे. तेथील दरवाजे खोलले आहेत. आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
– कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे 1 फूटाने उघडले.
– 9,297 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू, तर पायथा वीजगृहातून 2,100 क्युसेक्स विसर्ग सुरू
– एकूण 11,397 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू.

पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती आहे?
– पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोल्हापूरात मुसळधार पाऊस पडत आहे. शिराळमधील चांदोल धरण व राधानगरी धरणात तुफान पाऊस पडत आहे. राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. ज्यामधून 12 हजार क्सुसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होता. सातारा जिल्ह्यातही धुव्वांधार पाऊस सुरु आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कोयना परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोयना धरणात झपाट्यानं पाण्याची पातळी वाढत झाली. सांगलीतही पाऊस जोरदार बॅटिंग करत आहे.

विदर्भात काय स्थिती आहे-
पूर्व विदर्भात तुरळक पाऊस, पश्चिम विदर्भात ब-यापैकी पाऊस.

मराठवाड्यात काय स्थिती
उस्मानाबाद लातूर पट्ट्यात पावसाचा दमदार, बीड-जालन्यात तुरळक.