Published On : Wed, Sep 20th, 2017

बिहारमध्ये उद्‍घाटनाच्या 1 दिवस आधीच फुटले धरण; 828 कोटी पाण्यात

Advertisement

Bihar Dam
भागलपूर: बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील कहलगाव येथे उद्घाटनाच्या एक दिवस आधी धरण फुटल्याची घटना घडली आहे. 40 वर्षांपासून या धरणाचे काम सुरु होते. बटेश्वर गंगा पंप कॅनल प्रोजेक्ट अंतर्गत 828 कोटी रुपये खर्च करून तयार करण्‍यात आलेले धरण ट्रायलदरम्यान फुटले. c यांच्या हस्ते आज (बुधवार) सकाळी 11 वाजून 20 मिनिटाला या धरणाचे उद्‍घाटन होणार होते.

धरणाच्या उद्‍घाटनाच्या जय्यत तयारी सुरु होते. परंतु, मंगळवारी सायंकाळी चार वाजता धरणाची चाचणी घेण्यात आली. 12 पैकी केवळ 5 मोटर पंप चालू करण्‍यात आले होते. त्यानंतर अवघ्या एका तासात धरण फुटले.

यापूर्वी दोनला लांबले होते उद्‍घाटन
जिल्हाधिकारी आदेश तितरमारे यांनी दिलेली माहिती अशी की, धरण फुटल्यानंतर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा दौरा रद्द करण्‍यात आला आहे. धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. धरण पूर्णपणे तयार झाल्यानंतर त्याच्या उद्‍घाटनाची तारीख निश्चित करण्‍यात येईल. दरम्यान, यापूर्वी दोनदा धरणाच्या उद्‍घाटनाची तारीख निश्चित करण्‍यात आली होती. परंतु काही कारणास्तव कार्यक्रम रद्द करण्‍यात आला होता.

Gold Rate
06 May 2025
Gold 24 KT 97,000/-
Gold 22 KT 90,200/-
Silver/Kg 96,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एका तासात फुटले धरण
कालव्यावर बांधण्यात आलेल्या धरणावर एकूण 12 मोटर बसवल्या आहेत. परंतु ट्रायलवेळी केवळ 5 मोटार सुरु करण्यात आल्या होता. निम्या प्रेशरवर अवघ्या एक तासात धरत धुटले. पाण्‍याचा प्रवाह इतका होता की, एनटीपीसी हाऊसिंग कॉम्पलेक्सच्या जवळील पुलाच्या बाजुने धरणाच्या एक भाग कोसळला. पाणी थेट एनटीपीसी कॉलनीत शिरले. प्रत्येक घरात गुढघ्या इतके पाणी आहे. तसेच ओगरी आणि श्यामपूरमध्ये पाणी घुसले आहे. रानीपुर लधरियामध्ये शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि एसएसपी घटनास्थळी पोहोचले आहे.

Advertisement
Advertisement