Published On : Tue, Sep 26th, 2017

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार

नागपूर: रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºयास आरपीएफने पकडले. त्याच्या ताब्यातील दोन रेल्वे तिकीटा, पाच कोरे फार्म आणि एक हजार रोख जप्त केले. ही कारवाई आज दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आली.

अजहर सलिम खान (२९, रा. बजेरीया) असे अटकेतील दलालाचे नाव आहे. सनासुदीचे दिवस आले की दलाल सक्रिय होतात. साºयांनाच कन्फर्म बर्थ पाहिजे असते. प्रवाशांच्या या मानसिकतेचा फायदा घेत दलाल त्यांच्याकडून अधिक रक्कम वसूलतात. आज दुपारी १ वाजताच्या सुमारास आरपीएफ जवान विकास शर्मा हे संत्रा मार्केट परिसराकडील तिकीट केंद्रावर होते. तिकीट घेणाºया प्रत्येकाकडे त्यांचे बारीक लक्ष होते.

अजहरच्या हालचाली वरुन तो संशयीत वाटत होता. त्यामुळे शर्माने त्याची विचारपूस केली मात्र, त्याने समाधानकार उत्तर दिले नाही. त्याला ठाण्यात आणुन सखोल चौकशी केली असता त्याने दोन तिकीट घेतल्याचे सांगितले. दोन्ही तिकीटा तत्काळच्या होत्या. जयपूर – नागपूर आणि नागपूर मुंबई दुरंतोच्या बुधवारच्या या तिकीटांची किंमत ३ हजार ३२५ रुपये आहे. त्याच्या जवळ पाच कोरे फार्म आणि एक हजार रुपये रोख मिळाली.

त्याच्या विरुध्द गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. बुधवारी त्याला रेल्वे न्यायालयात हजर केले जाईल. मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनात व आरपीएफ निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात विकास शर्मा यांनी उपरोक्त कारवाई केली.