Published On : Sun, Jul 14th, 2019

रेल्वेने कटून महिलेचा मृत्यू

नागपूर : रेल्वे रूळ ओलांडण्याच्या धावपळीत भरधाव जाणाºया रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. ही थरार घटना आज रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अजनी रेल्वे स्थानकावर घडली. मृत महिलेची अद्याप ओळख पटली नाही.

लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी १२८६० हावडा – मुंबई गीतांजली एक्स्प्रेस नागपूरवरून निघाली. दरम्यान अजनी रेल्वे स्थानकावर एक ४० वर्ष वयोगटातील महिला रूळ ओलांडत असताना धडक लागून जागीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पंचनामा केला. महिलेच्या उजव्या हातावर गयाराम असे नाव गोंदविलेले आहे. अंगात निळ्या,पिवळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा ब्लाऊज घातलेली आहे. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात महिलेच पार्थिव पाठविले.

मृत महिला जवळपासचीच असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिची ओळख पटविण्यासाठी लोहमार्ग पोलिस प्रयत्न करीत आहेत. पुढील तपास हवालदार नारायण रेड्डी करीत आहेत.