Published On : Sun, Jul 14th, 2019

पोलीस स्टेशन परिसरात केली व्रुक्ष लागवड

Advertisement

व्रुक्ष लागवडीसह व्रुक्ष संगोपन करणे गरजेचे – पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांचे प्रतिपादन

रामटेक: व्रुक्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे .व्रुक्षामुळेच पर्यावरणाचे संतुलन टिकून राहील .व्रुक्ष लावण्यासोबत ते जगविण्याची तळमळ अंगी बाळगावी.’व्रुक्षवल्ली आम्हा सगे सोयरे ‘ ह्या संत वचनानुसार व्रुक्ष संवर्धनाकरिता आम्ही सगळे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी केले .

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलीस स्टेशन रामटेक तसेच नगरपरिषद रामटेक च्या संयुक्त विधमाने नुकतेच पोलीस स्टेशन रामटेकच्या आवारात तसेच पोलीस वसाहतीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच पार पडला . सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधिक्षक मोनाली राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी नयन आलुरकर यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांचेद्वारा वृक्षारोपण कार्यक्रम – २०१९ अंतर्गत ५० विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले.ह्याप्रसंगी रामटेक नगर परिषद मुख्याधिकारी स्वरूप खर्गे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती .

सदर वृक्षारोपण कार्यक्रमात मुख्याधिकारी स्वरूप खर्गे यांनी “वृक्षारोपणाचे महत्व सांगून पर्यावरणाबद्दल माहिती देऊन वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी आपली सर्वाची असून नुसते वृक्ष लावून होणार नाही तर त्याचे संगोपन करणेसुद्धा गरजेचे आहे,”असे प्रतिपादन केले .

राज्य शासनाच्या व्रुक्ष लागवडीच्या मोहिमेला यशस्वी करण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक राजु मुत्तेपोड ,प्रमोद कोडेकर ,श्रीकांत हत्तीमारे,अतुल कावळे यांचेसह सर्व पोलिस दल व होमगार्ड यांनी हिरीरीने भाग घेऊन विविध प्रकारच्या व्रुक्षांचे रोपण करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला .

Advertisement
Advertisement