Published On : Sun, Jul 14th, 2019

चारपदरी राष्ट्रीय महामार्गावरीव रस्ता दुभाजक बनणार अपघात स्थळ

Advertisement

कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील टेकाडी बस स्टाप समोरून नागपुर शहर चारपदरी बॉयपास रस्ता दुभाजक वाय पॉइंट अपघात निमंत्रण स्थळ बनल्यामुळे तार कंपनी चौक ते वाय पॉइंट पर्यंत सर्व्हिस रोड बनविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे .

राष्ट्रीय राज्यमार्ग व्दारे निर्मिती ऑटोमोटिव्ह चौक नागपुर ते टेकाडी बस स्टाप व नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गाला चारपदरी सिमेंट रस्ता जोडण्यात आल्याने येथे बॉयपास रस्ता दुभाजक वाय पॉइंट निर्माण झाल्याने अपघातास निमंत्रण स्थळ बनले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन पदरी रस्त्याला चारपदरी सिमेंट रस्ता जोडण्यात आल्या ने मनसर कडुन येणारे काही वाहन बॉय पास ने नागपुर कडे तर काही वाहन कन्हान कडे जातात तसेच कन्हान कडुन नागपुर कडे जाणारे काही वाहन याच वाय पॉइंटवर वळण घेऊन बॉयपास ने नागपुर ला जातात तर काही वाहनाच्या चालकांना रस्ता व्यवस्थित न कळल्याने तार कंपनी चौका पर्यंत दोन पदरी रस्त्यावरून विरूध्द दिशेने जातात यामुळे वाहनाचे सामोरासामोर धडक होऊन अपघात होतात.

या महामार्गावर प्रति मिनीट १ वाहने धावत असल्याने चांगलीच वळदळ असल्याने हे वाय पॉइंट बॉयपास दुभाजक रस्ता नेहमी अपघाताला निमंत्रण देत असते. येथे मोठय़ा अपघाताची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही.

यास्तव तार कंपनी चौक ते बॉयपास रस्ता दुभाजक वाय पॉइंट पर्यंत सर्व्हिस रोड बनविल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. तार कंपनी चौक ते वाय पॉइंट महामार्ग दुभाजक पर्यंत सर्व्हिस रोड बनविण्याची मागणी भगवानदास यादव, माजी प स सदस्य पंढरी बाळबुधे, विशाधर कांबळे, राजु गुडधे, मोतीराम कांबळे, स्वप्निल वासाडे, प्रभाकर बोराडे, सुर्यभान टाकळखेडे, विनोद यादव, अरविंद यादव सह परिसरातील नागरिकांनी केली आहे.