नागपूर महानगरपालिका स्थायी समीती ठराव क्र.395 दि.27/06/2003 व म.न.पा. सभागृह इराव क्र.201 दि.23/02/2004 च्या निर्णयान्वये सिताबर्डी रेल्वे स्टेशन समोरील उड्डाण पुलाचे खाली 175 दुकानाचे दुकान संकुल म.न.पा. द्वारा बांधण्यात आले व “प्रथम येणार प्रथम घेणार” या तत्वावर अग्रीम रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा करून घेवून वर्ष 2008 मध्ये 30 वर्षाकरीता दुकान वापरणेस आवंटीत करण्यात आले.
नागपूर महानगरपालिका सभागृहानी ठराव क्र.285 दि.29/09/2018 अन्वये सिताबर्डी रेल्वे स्टेशनच्या पश्चिम दिशेला अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुला ऐवजी सहा पदरी रस्ता बांधणेच्या कामाकरीता उड्डाणपुल व दुकान संकुल तोडण्याचे व दुकान संकुलातील बाधीत होणाऱ्या दुकानदारांना महामेट्रो द्वारा बांधण्यात आलेल्या संकुलात स्थानांतरीत करण्याचे निर्णय घेतला.
म.न.पा. सभागृहानी घेतलेल्या निर्णयान्वये दुकानदारांकडून दुकाने रिकामे करून घेणेसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम 81(B)(2) च्या तरतुदी अंतर्गत 160 दुकानदारांना नोटीस तामील करण्यात आले. 129 दुकानदारांनी नोटीस ची दखल घेवून उत्तर सादर केले. दुकानदारांना सुनावणीकरीता बोलाविण्यात आले. 125 दुकानदार सुनावणीकरीता हजर झालेत त्यापैकी 47 दुकानदारांनी नुकसान भरपाई स्वरूपात अग्रीम जमा रक्कम व्याजासह परत मागीतली, 30 दुकानदारांनी महामेट्रोनी बांधलेल्या संकुलात जाणेस उच्छुकता दर्शविली, 44 दुकानदारांतर्फे उपस्थित प्रतिनिधींनी सदर ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या दस्ताऐवजची मागणी केली व 4 दुकानदारांनी कारणे दाखवा नोटीसचे उत्तर दाखल केले परंतू सुनावणीमध्ये सहभागी झाले नाही व 35 दुकानदारांनी कोणताही दाखल घेतलेली नाही.
सुनावणीमध्ये नुकसान भरपाईबाबत केलेली मागणी म.न.पा. सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली व म.न.पा. सभागृहानी ठराव क्र.156 दि.09/09/2021 रोजी निर्णय घेवून सदर दुकान संकुलातील दुकान वापरणेचा कालावधीकरीता अग्रीम जमा रक्कमेतून वापर शुल्क वजा जाता शिल्लक जमा रक्कम 8% व्याजानी परत करणेचे निर्देश दिले तसेच जे दुकानदार महामेट्रोनी बांधलेल्या संकुलात जाणेस उच्छुक असतील त्यांना दुकान आवंटीत करणेचे निर्देश दिले. म.न.पा. सभागृहाचे निर्देशाचे अनुषंगाने संपूर्ण 160 दुकानदारांना लेखी माहिती कळवून पर्याय निवडणेची विनंती करण्यात आली. त्यापैकी 44 दुकानदारांनी 8% व्याजानी शिल्लक अग्रीम जमा रक्कम परत घेणेस व दुकानाचा ताबा परत करणेस संमती दिली असे 44 दुकाने व 57 दुकानदारांनी महामेट्रोच्या संकुलात जाणेस इच्छुकता दर्शविल्याने इश्वर चिठ्ठी पद्धतीने महामेट्रोच्या संकुलातील 57 दुकाने आवंटीत करण्यात आले असे उड्डाणपुल संकुलातील 57 दुकाने व रिकामे असलेली 15 दुकाने अशी 116 दुकाने रिकामे करून तोडणेची कार्यवाही आज दि.22/08/2022 पासून सुरू करण्यात आलेली आहे.
19 दुकानदारांनी मा. उच्च न्यायालयात दाद मागीतली आहे व 25 दुकानदारांनी मा. जिल्हा न्यायालयात दाद मागीतली आहे. सदर 44 दुकानदारांकरीता अजूनही महामेट्रोनी बांधलेल्या संकुलातील दुकान स्विकारण्यास किंवा शिल्लक अग्रीम जमा रक्कम 8% नी स्विकारून उड्डाणपुल संकुलातील दुकान खाली करण्यास म.न.पा. द्वारा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.