Published On : Mon, Mar 8th, 2021

नेरीच्या अवैध मोहफुल दारुभट्टीवर धाड

– 1 लक्ष 14 हजाराच्या मुद्देमाल जप्तीसह एक आरोपी अटक, 2 पसार

कामठी :- अवैध वाळू उत्खनसाठी प्रसिद्ध असलेल्या नेरी गावातील अवैध वाळू उत्खननाला बंदी आल्याने या गावात आता मोहफुल दारू भट्टीचे अवैध व्यवसायाने पाय पसरले असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांना कळताच पोलिसांनी सापळा रचून नेरी गावातील पॉल भट्टा परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या मोहफुल दारूच्या भट्टीवर यशस्वीरीत्या धाड घालण्याची कारवाही गतरात्री 2 वाजता केली असून या धाडीतून 45लीटर मोहफुलाची दारू, इतर साहित्य तसेच दोन दुचाकी असा एकूण 1 लक्ष 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपी जितेंद्र तांडेकर वय 35 वर्षे रा पिपरी विरुद्ध गुन्हा नोंदवित अटक करण्यात आले तसेच पसार आरोपी रमेश तांडेकर व विवेक तांडेकर विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला.

ही यशस्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे, एपीआय कननाके, पोलीस उपनिरीक्षक कार्वेकर, पप्पू यादव,अखिलेश रॉय, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकलीकर, राहुल वाघमारे, सराटे, सुधीर कनोजिया,उपेंद्र यादव, संदीप भोयर, मनोहर राऊत, निलेश यादव, अनिल बाळराजे, प्रमोद वाघ आदींनी केली असुन पुढील तपास सुरू आहे