Published On : Mon, Mar 8th, 2021

कामठी तालुक्यात महिलांची प्रबळ शक्ती वाढीवर

कामठी :-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटना भारत देशाला अर्पण केली व भारतीयांनी हे संविधान अंगीकृत करूण घेतले.धर्माच्या नावाखाली धर्मग्रंथानी परंपरांनी निर्माण केलेली स्त्रीची गुलामगिरो डॉ बी आर आंबेडकर यांनी राज्यघटनेत स्त्रीविषयक कायद्याचा समावेश केला व या भारतोय संविधाना मुळेच आजची स्त्री आपल्या स्वतःच्या अस्तित्वाप्रति जागृत होऊन प्रगतीचे एक एक शिखर पादांक्रीत करित आहे.परिणामी आज कामठी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालतात महिलाराज दिसून येत असून अधिकारपद गाजवीत आहेत.

स्त्री म्हणजे लाजाळू , दुबळी व भावनिक असा समाजात गैरसमज आहे.मुलगी म्हटलं की अनेक बंधने।येतात .अंधार होण्यापूर्वी घरी परतलेच पाहिजे, कुणासोबतं जास्त बोलू नये, जास्त फिरू नये अशी समज होऊन बसली आहे परंतु वेळ पडल्यास हीच घरातील लक्ष्मी गुन्हेगाराचा नायनाट करण्यासाठी दुर्गेचे रूप देखील घेऊ शकते .संविधानाने दिलेल्या हक्कामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन चालणारे महिला आज समोरघडीला जात असून कामठी तालुक्याचा विचार केल्यास कामठी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात महिला राज दिसून येतो.

कामठी पंचायत समिती कार्यालयात महीला बीडीओ अधिकारी अंशुजा गराटे, जुनी कामठी पोलीस स्टेशन ला महिला पोलिस उपनिरीक्षक आहेत तसेच शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक महिला अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत तर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी आहेत , सरपंच पदी बघितल्यास सरपंच प्रांजल वाघ सारखे कित्येक महिला सरपंच पदातून गावाचे लोकप्रतिनीतव करीत आहेत तसेच ग्रामीण भागात कांग्रेसमय वातावरण निर्माण करणाऱ्या जी प सदस्य प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे सारख्या महिला लोकप्रतिनिधींत्व करीत आहेत .

तसेच महिला समुपदेशन केंद्राच्या अधिकारी शीतल चौधरी, संध्या रायबोले, मीनाक्षी कांबळे ह्या सुद्धा संसार थाटविण्याची मोलाची भूमिका साकारत आहेत या सर्वांगीनदृष्ट्या विचार करता आज महिला आघाडीवरच असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनो राज्यघटनेत हिंदू कोड बिल कायदा आणून स्त्रियांना वारसा हक्क,दत्तक कायदा, स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेली समान संधी इत्यादी गोष्टी कायद्याच्या स्वरूपातुन दिल्या आहेत. त्यामुळे बाबासाहेबानी देशाला अर्पण केलेल्या या संविधानामुळेच महिलांना प्रबळशक्ती निर्माण झाली असून अधिकाधिक ठिकाणी महिलराज दिसून येत आहे.
– संदीप कांबळे,कामठी