Advertisement

नागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने जरीपटक्यातील एका कुंटणखान्यावर छापा मारून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या एका दाम्पत्याला अटक केली. नम्रता (वय ४०) आणि नरेश धोंडबाजी बावणे (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी दाम्पत्याची नावे आहेत.
जरीपटक्यातील आहुजानगरात विजय वाघमारे यांच्याकडे बावणे दाम्पत्य भाड्याने राहत होते. महिला-मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ते तेथे वेश्याव्यवसाय करवून घेत होते.
Advertisement
ही माहिती कळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाईसाठी सापळा लावला. बनावट ग्राहक पाठवून बावणे दाम्पत्याकडे वेश्याव्यवसायाबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी पैसे घेऊन ग्राहकाला देहविक्रय करणारी एक मुलगी उपलब्ध करून दिली.
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement