Published On : Thu, Aug 20th, 2020

जयभीम चौकात जुगार अड्यावर धाड, सहा जुगाऱ्यावर गुन्हा दाखल

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौकात एका बंद घरात गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अडयावर धाड घालण्यात पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाही पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी दुपारी 3 वाजता केली असून या धाडीतून 52 तास पत्ते , नगदी 5240 रुपये जप्त करीत सहा जुगाऱ्याना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्हा नोंदविलेल्या सहा जुगाऱ्यात नवल रंगारी वय 28 वर्षे रा राहुल बुद्ध विहार जवळ, पंकज मेश्राम वय 33 वर्षे रा जयभीम चौक, सुरज घोडेस्वार वय 20 वर्षे रा जयभीम चौक, निखिल गजभिये वय 21 वर्षे रा जयभीम चौक, रितेश वाहने 23 वर्षे गणेश ले आउट येरखेडा, सोमनाथ कांबळे वय 55 वर्षे रा जयभीम चौक कामठी असे आहे.

ही यशस्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक विनोद धोंगडे, सतीश मोहोड, निलेश यादव, श्रीकृष्ण दाभने , ललित शेंडे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे