Published On : Thu, Aug 20th, 2020

1लक्ष 45 हजार रुपये किमतीचे गोवंश जनावरे गेले चोरीला

Advertisement

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा मार्गाहुन दररोज गोवंश जनावरांची अवैधरित्या मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून निर्दोष गोवंश जनावरांना जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेल्या जाते हा प्रकार इथेच थांबत नाही तर बहुधा शेतकऱ्यांचे खुंट्याला बांधलेले जनावरे सुद्धा चोरून नेत कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेत असल्याच्या प्रकाराला गती येत आहे .

या प्रकारची गुन्हेगारी घटना नुकतीच घडली असून कामठी रहिवासी रोशन यादव यांच्या गादा गावातील शेतातील खुंट्याला बांधून असलेले म्हशी, गाय, हेलले, वासरे यातील दोन म्हशी चोरीला गेल्याची घटना गतरात्री घडली असून पीडित शेतकऱ्याचे 1 लक्ष 45 हजार रुपये किमतीचे म्हशी चोरून नेल्याची घटना घडली असून यासंदर्भात फिर्यादी रोशन यादव यांनी स्थानिक पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मात्र हे जनावरे चोरून नेणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करण्यात यावे या मागणीसाठी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुख्य उपस्थितोत डी सी पी निलोत्पल यांना निवेदित करण्यात आले याप्रसंगी रोशन यादव, भाजप चे पदादीकारी पंकज वर्मा, राजा यादव, मंगेश यादव, आदी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी