Published On : Thu, Jul 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

गंगा-जमुना वस्तीतील देहव्यापार अड्ड्यावर छापा; तरुणीची सुटका, 65 वर्षीय महिलेवर गुन्हा

Advertisement

नागपूर : नागपूर शहरातील गंगा-जमुना वस्तीमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत एका पीडित तरुणीची सुटका करण्यात आली असून मुख्य आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगा-जमुना वस्तीच्या दिल्ली गल्ली परिसरातील एका घरात एका तरुणीला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास भाग पाडले जात आहे. माहितीची खातरजमा केल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने पंच आणि बनावट ग्राहकाच्या (डिकॉय पंटर) मदतीने सापळा रचत छापा टाकला.

छाप्यादरम्यान पोलिसांनी पीडित तरुणीची सुरक्षित सुटका केली. तपासात आरोपी महिला ग्राहक उपलब्ध करून देत तरुणीकडून देहव्यापार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी मुन्नीबाई सुरेश कालखोर (वय 65), रा. गंगा-जमुना वस्ती, नागपूर हिच्याविरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 395/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 143(2)(3) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956 मधील कलम 3, 4, 5 आणि 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असून शहरातील देहव्यापार आणि मानवी तस्करीविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.