Published On : Tue, Jan 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा गोंडवाना पिंपरी येथे छापा; बनावट दारूचा कारखाना उध्वस्त

Advertisement

नागपूर: राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाच्या भरारी पथकाने गोंडवाना पिंपरी येथील माय टाऊन सोसायटी सेक्टर-8 मधील बंगलो क्रमांक १३३ येथे मोठी कारवाई केली आहे. येथे बनावट देशी व विदेशी दारूचा कारखाना सुरू असल्याचे उघड झाले असून, त्यावर छापा टाकून अवैध उत्पादन थांबवण्यात आले.

घटनास्थळावरुन १,०९० लिटर बनावट देशी दारूचा ब्लेंड, महाराष्ट्रात विक्रीस बंदी घालण्यात आलेल्या गोवा व्हिस्कीच्या ३५६ बाटल्या, ९० बिएल बनावट देशी दारू, इलेक्ट्रॉनिक बॉटल सीलिंग मशीन, बनावट रॉकेट देशी दारूचे कागदी लेबल, जीवंत पत्रीबुचे, रिकाम्या बाटल्या, बनावट रॉयल स्टॅग विदेशी दारूचे प्लास्टिक जीवंत बुचे आणि एक चारचाकी वाहन असा एकूण २४ लाख ६७ हजार ७०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणी गुन्हा क्रमांक १९/२०२६ अंतर्गत शुभम गोविंद तिवारी (३१, फरार मुख्य आरोपी), गोविंद रामदत्त तिवारी (५९), शैलेंद्र धुर्वे (२४), रघुनाथ उईके (२१), राजकुमार उईके (२५), द्वारका शिवलाल इनवाती (४५) आणि प्रमोद नथ्थुजी सयाम (४२) यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे.

ही कारवाई विभागीय भरारी पथकाच्या निरीक्षक दशरथ क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक जगदीश पवार, लांबाडे, निरीक्षक बालाजी चाळणेवार, दुय्यम निरीक्षक वैभव दीवाण, अमित क्षीरसागर, शुभम ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जवान राहुल सपकाळ, गजानन राठोड, सुधीर मानकर, किरण वैद्य, सचिन आडोळे आणि विनोद डुंबरे यांनी देखील यशस्वी सहकार्य केले.

सदर प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक जगदीश पवार करत आहेत. अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविषयी तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement