Published On : Fri, Jul 20th, 2018

विडिओ : …अन् राहुल गांधींची भर लोकसभेत पंतप्रधान मोदींना ‘जादूकी झप्पी’

लोकसभेत भाजप सरकार विरोधातील अविश्वास दर्शक ठरावावर चर्चा सुरू असून या दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले . दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भाषणाकडेही सभागृहाचे लक्ष लागले होते. त्यानुसार राहुल गांधींनीही आक्रमक भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष्य केले. भाजप म्हणजे भारतीय जुमला पार्टी असल्याचे राहुल यांनी म्हटले. मात्र, भाषणाच्या सरतेशेवटी राहुल गांधींनी मोदींना जादू की झप्पी दिली.

‘तुम्ही मला पप्पू म्हणा, मला शिव्या द्या पण माझ्या मनात तुमच्यासाठी द्वेष नाही’, असे म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला. भाषण संपल्यानंतर राहुल गांधी पंतप्रधान बसलेल्या जागी गेले आणि त्यांची भेट घेतली. मोदींनीही राहुल गांधी याच्याशी हात मिळवत त्यांना शाबासकी दिली. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींना ‘जादूकी झप्पी’ दिली. राहुल गांधी यांच्या या कृतीने पंतप्रधान क्षणभर बावचाळल्यासारखे दिसत होते.