Published On : Thu, Jun 7th, 2018

राहुल व्यसनी, पंतप्रधान होण्याची लायकी नाही

Advertisement

दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधी हे व्यसनी असून पंतप्रधानपदावर विराजमान होण्याची त्यांची लायकी नाही, असे ट्विट मनजिंदर सिंग यांनी केले आहे.सिरसा यांच्या या ट्विटचा सूर लक्षात घेता, राहुल गांधी यांनी – पंजाबमधील ७० टक्के तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन आहे, असे जे विधान केले होते त्यामुळे ते दुखावले असल्याचे दिसते.

भाजपाच्या पाठिंब्यावर दिल्लीतील राजौरी गार्डन पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून मनजिंदर सिंग सिरसा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मनजिंदर सिंग सिरसा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी विमानतळावर रांगेत उभे असल्याचे दिसते.

Gold Rate
06Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,300 /-
Gold 22 KT ₹ 1,11,900 /-
Silver/Kg ₹ 1,48,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या ट्विटमध्ये सिरसा म्हणतात, जो पंजाबमधील ७० टक्के तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन आहे असे म्हणत होता, तोच आज व्यसनी दिसत आहे. राहुल गांधी यांचा चेहरा पंतप्रधानपदाच्या लायक नसून त्यांनी तर आधी व्यसनमुक्ती केंद्रात जायला हवे.मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर आल्यास कर्जमाफी देऊ, असे आश्वासन देणाऱ्या राहुल गांधींवर टीका करताना सिरसा म्हणतात, राहुल गांधी यांनी असेच आश्वासन पंजाबमध्येही दिले होते.

पण निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी आता नरेंद्र मोदी सरकारने कर्ज माफ करावे, अशी मागणी केली. मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांनाही राहुल गांधीं फसवत आहेत. अशी खोटारडी व्यक्ती पंतप्रधानपदाची दावेदार असली पाहिजे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Advertisement
Advertisement